कु. शिफा अंजुम हिने दहावी परीक्षेत 70.60 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले

अकोला येथील स्थानिक हाजी नगर, अकोट फाईल परिसरातील मिल्लत उर्दू हायस्कूलची विद्यार्थिनी कु. शिफा अंजुम अब्दुल फईम हिने दहावी परीक्षेत 70.60 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शिफा अंजुम हिच्या या यशामुळे शाळा व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षक व पालकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.