मुख्यमंत्री . देवेंद्रजी "देवा भाऊ" फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त अकोल्यात 1008 चुडा लाडू वाटप, वारकरी व रुग्णांना सेवा
अकोला -:
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारे, महाराष्ट्राच्या *14 कोटी जनतेच्या कल्याणासाठी* अहोरात्र लढणारे, *लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ* राज्याचे मुख्यमंत्री *मा. श्री. देवेंद्रजी "देवा भाऊ" फडणवीस* यांच्या *56 व्या वाढदिवसानिमित्त* भारतीय जनता पार्टी, अकोला जिल्ह्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
*सेवाभावी उपक्रमाचा भाग म्हणून* शहरातील *वारकरी, रुग्ण तसेच रेल्वे स्थानक, मेन हॉस्पिटल, बस स्थानक, राजेश्वर मंदिर, राम मंदिर, रिझर्व माता मंदिर, शनी मंदिर, दुर्गा माता मंदिर, संतोषी माता मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर* आणि *उड्डाणपुला खाली* गरजू नागरिकांना *1008 चुडा लाडूंचे वाटप* करण्यात आले.
*माजी मंत्री मा. श्री. संजयभाऊ धोत्रे* यांनी सुरू केलेली परंपरा यावर्षीही कायम ठेवत *पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचा सत्कार करून त्यांना चुडा लाडूंचे वितरण* करण्यात आले.
या सेवाकार्यात *आमदार मा. श्री. रणधीरजी सावरकर, खासदार श्री. अनुपजी धोत्रे, पालकमंत्री अॅड. आकाशजी फुंडकर, जिल्हाध्यक्ष श्री. संतोष शिवरकर, जयंत मसने, महानगरपालिका स्थायी समिती सभापती श्री. विजय अग्रवाल* यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
*यावेळी
राम पाटील, माधव मानकर, गिरीश जोशी, रमेश आप्पा खोबरे, डॉ. संजय शर्मा, गोपाल खुमकर, सागर पाठक, मनीष गावंडे, अजिंक्य राऊत, संजय कोरडे, अजय जोशी, विजय खत्री, प्रशांत लोहिया, अॅड. रूपाली काकडे, संदीप गावंडे, विवेक भरणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यांनी कार सेवा केली .
देवा भाऊंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाभरात सेवा, आरोग्य व धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहेत.
---
0 टिप्पणियाँ