अकोला:- दि.13/7/2026 रोजी अशोक वाटिका अकोला येथे बौद्ध समाज संस्था संचालक(अल्पसंख्यांक) कृती समितीची बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये अल्पसंख्यांक विभागातील बौद्ध संस्था अनुदान या योजनेमध्ये अकोला जिल्ह्यातील बौद्ध संस्थांनी प्रस्ताव सादर केले होते. परंतु 5 महिन्याचा कालावधी उलटुनही प्रस्तावावर कुठलीच कारवाई झाली नाही म्हणून "बौद्ध समाज संस्था (अल्पसंख्यांक) संस्था कृती समितीची च्या वतीने मा. मंत्री अल्पसंख्यांक मुंबई मंत्रालय यांना भेटून निवेदन देण्याचे ठरले आहे
निवेदन सोमवार 20/7/2026 देण्यात येणार आहे. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध समाज संस्था संचालक(अल्पसंख्यांक) कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी बैठकीला जीवन दारोकार, संजय कांबळे दिलीप शिरसाट,सौ.शोभा वानखडे,सौ.शोभा आठवले,राहुल भगवान तायडे,अमरदीप संदाशीव, उपस्थित होते.
0 टिप्पणियाँ