Ticker

6/recent/ticker-posts

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात    अभिवादन

अकोला, दि.२२ : महाराष्ट्र राज्याचे  दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी विशाल धांडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक श्याम धनमने यांनी स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
०००

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ