अकोला, दि. ११ : पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, बाबुळगाव (जहा.), अकोला येथे शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता सहावी प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा (JNVST-2027) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य श्री. तायडे यांनी केले आहे.
अकोला जिल्ह्यातील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षेद्वारे नवोदय विद्यालयात प्रवेशाची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातून गुणवत्तेनुसार ८० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून, ही निवड अखिल भारतीय स्तरावरील परीक्षेद्वारे होईल.
जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्र शासनाच्या अखत्यारीतील निवासी विद्यालय असून येथे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, निवास, भोजन, गणवेश, पाठ्यपुस्तके तसेच संगणक, क्रीडा, संगीत, कला आणि एनसीसीसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
**अर्जासाठी पात्रता :**
* विद्यार्थी इयत्ता पाचवीत शिकत असावा.
* जन्मतारीख १ मे २०१५ ते ३१ जुलै २०१७(दोन्ही दिवस धरून) दरम्यानची असावी.
* विद्यार्थी व पालक अकोला जिल्ह्याचे रहिवासी असावेत.
* आरक्षणाचा लाभ शासनाच्या नियमानुसार दिला जाईल.
**महत्त्वाच्या बाबी :**
* ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख **३१ जुलै २०२६** आहे.
* प्रवेश परीक्षेसाठी कोणतेही शुल्क नाही.
* **प्रवेश परीक्षा २८ नोव्हेंबर २०२६ (शनिवार)** रोजी होणार आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, बाबुळगाव (जाह.), अकोला येथे संपर्क साधावा. तसेच ऑनलाइन अर्ज **[https://cbseitms.rcil.gov.in/nvs/](https://cbseitms.rcil.gov.in/nvs/)** या संकेतस्थळावर भरता येणार आहेत.
0 टिप्पणियाँ