Ticker

6/recent/ticker-posts

समान नागरी कायदा मसुदा समितीचे सदस्यन्या. मेहरे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव

समान नागरी कायदा मसुदा समितीचे सदस्य
न्या. मेहरे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव
अकोला, दि २७ : समान नागरी कायदा मसुदा समितीवर महाराष्ट्र शासनाने माजी न्यायमूर्ती संजय मेहरे यांची नियुक्ती केली आहे. त्याबद्दल इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात रेड क्रॉस सोसायटीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते त्यांना आज गौरविण्यात आले. 

यावेळी इंडियन रेड  क्रॉस सोसायटीचे मानद सचिव प्रभजीतसिंह बछेर, ॲड.महेंद्र साहू, ॲड. सुभाष मुंगी, संदेश रांदड,रामहरी डांगे, अमर गौड,कपिल रावदेव, राजू बुडकले, मोहन काजळे आदी उपस्थित होते. समान नागरी कायद्याचा मुख्य उद्देश सर्व नागरिकांना समान नियमांच्या कक्षेत आणणे आहे. याबाबत नागरिकांची मते व अभिप्राय मागविण्यात येत असून, नागरिकांचे अभिप्राय महत्त्वाची भूमिका बजावतील असे प्रतिपादन समान नागरी कायदा मसुदा समितीचे सदस्य उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संजय मेहरे यांनी केले. प्रास्ताविक ॲड.सुभाषसिंग ठाकूर यांनी केले. श्री.बछेर यांनी सूत्रसंचालन केले. आभार सीए मनोज चांडक यांनी मानले.
००००

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ