अकोला;-शासकीय विश्राम गृह येथे बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश कमिटीच्या आदेशानुसारBLA बाबत जिल्हा कमिटीच्या वतीने आयोजन केले होते. या बैठकीला प्रमुख पाहुणे प्रदेश सचिव तथा झोन इन्चार्ज इंजिनीयर माननीय दादारावजी उईके, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश सचिव तथा प्रभारी पंडित दादा बोर्डे, यांची उपस्थिती होती.
बहुजन समाजातील मतदारांची नावे मतदार यादी मधून वगळल्या जाणार नाहीत याची खबरदारी तमाम राजकीय पक्षांमध्ये काम करणाऱ्या सर्व बहुजन पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. तसेच प्रदेश कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या परवानगीने जिल्हा कमिटी मधील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना डच्चू देऊन पक्षातील सक्रिय कार्यकर्त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या दृष्टीने नियुक्तीपत्र देण्यात आली. तसेच नवीन जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. नवीन कार्यकारणी मध्ये जिल्हाअध्यक्षपदी एडवोकेट मनीष तुकारामजी मस्के व जिल्हा सचिवपदी रामकृष्ण दौलतराव इंगळे, जिल्हा उपाध्यक्षपदी डॉक्टर मिलिंद चौखंडे, सय्यद अझरुद्दीन शमशुद्दीन, काशिनाथ धामोडे, दयानंद इंगळे, महासचिव पदी विजय गणवीर, कोषाध्यक्ष चंद्रमणी वाहूरवाघ, सदस्य संतोष इंगळे, अवधूत शेंडे, रमेश दारोकार, यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी शहनवाज शहा, विनोद खाडे, रिजवान खान, श्यामलाल गवते, संगीता धांडे, दादाराव खांडेकर, प्राध्यापक कांबळे, कांतीलाल शाम इंगळे, उमेश अढाऊ, देवराव सदाशिव नितीश तायडे, यांच्यासह कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या संचालन दयानंद इंगळे आभार प्रदर्शन जिल्हा सचिव रामकृष्ण इंगळे यांनी केले.
0 टिप्पणियाँ