Ticker

6/recent/ticker-posts

_विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम_ बीएलओ दांपत्याची उल्लेखनीय कामगिरी _अवघ्या 18 दिवसांत वितरण, संकलन व डिजिटायझेशन 100 टक्के पूर्ण_

_विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम_
 बीएलओ  दांपत्याची उल्लेखनीय कामगिरी
 _अवघ्या 18 दिवसांत  वितरण, संकलन व डिजिटायझेशन 100 टक्के पूर्ण_

अकोला, दि. १७ :  मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात  31-अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील बीएलओ
दांपत्याने फॉर्म वितरण, संकलन व डिजिटायझेशनचे काम अवघ्या अठरा दिवसात पूर्ण केले. 


यादी भाग क्रमांक 28 चे बीएलओ श्री. गजानन पांडुरंग कराळे (एकूण मतदार – 665) तसेच यादी भाग क्रमांक 30 च्या बीएलओ सौ. सपना गजानन कराळे (एकूण मतदार – 521) यांनी अत्यंत उत्कृष्ट कार्य करून अवघ्या 18 दिवसांत शंभर टक्के फॉर्म वितरण, फॉर्म संकलन आणि डिजिटायझेशनचे काम पूर्ण केले आहे.
विशेष बाब म्हणजे हे दोघेही पती-पत्नी असून शिक्षक म्हणून नियमित शालेय जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाने सोपविलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे, वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण केली आहे. त्यांच्या कार्यातून कर्तव्यनिष्ठा, उत्कृष्ट नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि लोकसेवेप्रती असलेली बांधिलकी दिसून येते. त्यांच्या या कार्यामुळे इतर बीएलओंसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व बीएलओ, पर्यवेक्षक, केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यामध्ये श्री. गजानन कराळे व सौ. सपना कराळे यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून दोहोंचेही अभिनंदन करण्यात आले. मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शरद जावळे  यांच्या हस्ते दोघांचा गौरव करून शुभेच्छा  देण्यात आल्या. 

०००

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ