Ticker

6/recent/ticker-posts

नमस्ते दिनानिमित्त सफाई कामगारांना रेनकोट चे वितरण

नमस्ते दिनानिमित्त सफाई कामगारांना रेनकोट चे वितरण
अकोला:-नागरिकांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून नमस्ते दिनानिमित्त 
प्रभाग क्र.2चे नगरसेवक सैय्यद रहीम उर्फ सैदु यांच्या हस्ते सफाई कामगारांना मोफत रेनकोट वितरण करण्यात आले 
पावसाळ्यात पाऊस चिखल आणि प्रतिकूल वातावरणात ही सफाई कर्मचारी नियमितपणे आपली सेवा बजावत असतात त्यांना काम करताना अडचणी येऊ नये आणि त्यांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी डॉ.रवि माहोर (सफाई इन्स्पेक्टर), तिलक सारसर,शेख रसुल चायवाले, शेख जमील पानवाले, सैय्यद अलीम, सामाजिक कार्यकर्ता कलीम खान ऑटो पार्ट, इमरान मोबाईल शॉपी वाले, अफसर किराणा वाले, शेख टिपू कुरेशी, सैय्यद असलम ठेकेदार, यांच्या सह नागरीक उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ