साजिद खान पठाण यांना परदेशातून जीवे मारण्याची धमकी ह्यूमन राईट असोसिएशनने पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
अकोला प्रतिनिधी -: मा. आमदार साजिद खान पठाण यांना परदेशातून जीवे मारण्याची धमकी आणि खंडणीची मागणी करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. स्वतःला विष्णुई गँगशी संबंधित शुभम लोणकर असे सांगणाऱ्या व्यक्तीकडून कॅनडामधून फोन करून “तुम्ही मला १० कोटी रुपये द्या, अन्यथा तुम्हाला गोळ्या घालून ठार मारीन,” अशी धमकी देण्यात आल्याचे समजते.
त्यानंतर काही दिवसांनी मा. आमदार साजिद खान पठाण यांच्या एका परिचित व्यक्तीलाही फोन करून “साजिद खानला सांग १० कोटी रुपये आणून दे. हो किंवा नाही यामध्ये उत्तर दे. जसा मुंबईमध्ये बाबा सिद्दिकी यांचा खून केला, तसाच तुझाही हाल करू,” अशी गंभीर धमकी देण्यात आली.
या प्रकरणाची तक्रार मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला यांच्याकडे दाखल करण्यात आली असून, सदर प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. यामध्ये खंडणी, जीवे मारण्याची धमकी तसेच संघटित गुन्हेगारीचा संशय निर्माण होत आहे. संबंधित आरोपी परदेशात, विशेषतः कॅनडामध्ये असल्याची माहिती समोर येत असल्याने या प्रकरणाचा सखोल आणि तातडीने तपास होणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर मानवाधिकार न्याय संघटना, अकोला यांच्यावतीने मागणी करण्यात येत आहे की, सदर प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, तांत्रिक व सायबर तपासाच्या माध्यमातून संबंधित फोन कॉल, आयपी तपशील, कॉल रेकॉर्ड व इतर डिजिटल पुरावे तपासून आरोपीचा शोध घेण्यात यावा, तसेच आवश्यक असल्यास केंद्रीय व आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांशी समन्वय साधून आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
तसेच मा. आमदार साजिद खान पठाण व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक पोलीस संरक्षण तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती रवींद्र गवई, जिल्हाअध्यक्ष, ह्युमन राईट जस्टीस असोसिएशन अकोला चे वतीने करण्यात येत आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बीजीरवींद्र गवई, राष्ट्रीय सचिव संगपाल शिरसाट, जिल्हा महिला अध्यक्ष हर्ष खंडारे, राजविलास वानखेडे, राजेश खांडेकर, संजय मेश्राम, प्रभाकर कवडे,सुरेखा राऊत, मंगला तायडे, शालू नाईक, सुरेश मोरे, संगपाल खंडारे, उपस्थित होते.
0 टिप्पणियाँ