Ticker

6/recent/ticker-posts

भव्य मोफत आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांनी घेतला लाभ

भव्य मोफत आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांनी घेतला लाभ
अकोला:-:इंटरनॅशनल ह्युमन राइट्स पीस डेव्हलपमेंट असोसिएशन (IHRPDA ) व श्री सत्यसाई सेवा संघटना (अकोला जिल्हा मोबाईल मेडिकल प्रोजेक्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने अकोट येथील इफ्तेकार प्लॉट, मोहम्मदिया मशिदीसमोर भव्य मोफत  आरोग्य शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील गरजू नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचे वाटप करण्यात आले.या शिबिराचे  उद्घाटन मुख्य अतिथी 'इंटरनॅशनल ह्युमन राइट्स पीस डेव्हलपमेंट असोसिएशन'चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) इम्रान परवेझ यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष इम्रान खान, महाराष्ट्र उपाध्यक्ष अब्दुल कदीर साहेब (वकील), नॅशनल लीगल ॲडव्हायझर डॅनिश अझलान, अकोटचे नगरसेवक आरिफ शहा, वरिष्ठ पदाधिकारी सोहेल रजा साहेब आणि नॅशनल जनरल सेक्रेटरी मलिक सर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी निर्भय युवा पत्रकार संघटना, अकोटचे अध्यक्ष नीलकंठ वसू पाटील यांनी शिबिराला भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले व उपक्रमाचे कौतुक केले.मोफत औषधे आणि चष्मा वाटप शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सत्यसाई समितीच्या विशेष सौजन्याने रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदनाशामक औषधे, मल्टी-व्हिटॅमिन सिरप, अँटीबायोटिक्स आणि इतर आवश्यक औषधे मोफत देण्यात आली. यासोबतच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांना अवघ्या १०० रुपयांत नजर चष्म्यांचे वाटप करण्यात आले.तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवाशिबिरात परिसरातील नामांकित आणि अनुभवी डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची बारकाईने तपासणी केली. यामध्ये डॉ. अंकुश तोष्णीवाल (MBBS, MD Medicine),  महाराष्ट्र सचिव डॉ. साकिब, डॉ. दुर्गा तोषनीवाल (BDS, MDS Pedodontist), महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. मुश्ताक अहमद, डॉ. शहजाद आणि डॉ. नाझिया बी. यांनी रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली.टीमचे परिश्रमहे भव्य शिबिर यशस्वी करण्यासाठी अकोट शहर अध्यक्ष रहमत खान इंजिनिअर, उपाध्यक्ष मोहम्मद मोबीन, अकोला जिल्हा युवा अध्यक्ष योगेश शिवाजी मगर, महाराष्ट्र लीगल ॲडव्हायझर ॲडव्होकेट मोहम्मद जुबेर, अकोट सहसचिव आमीर खान आणि तालुका सचिव सय्यद सुफियान यांच्यासह संपूर्ण टीमने मोलाचे परिश्रम घेतले. या उपक्रमाचे अकोट परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ