अकोला - शेगाव - संकल्प बहुउद्देशीय संस्था पारस व ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु.यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० मान्यवरांचा राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार २०२६ देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचितांचा प्रकाशचे मुख्य संपादक महेंद्र डोगरे, कार्यक्रमाचे उद्घाटक नगरसेवक गजानन कांबळे, रुग्ण समाज कल्याण समिती सदस्य अश्वजीत सिरसाट, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सम्राट अशोक सेना संस्थापक अध्यक्षआकाश शिरसाट , कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रा.संजय खडसे उपजिल्हाधिकारी कार्यक्रमाचे विशेष अतिथी सदानंद माहुरे (रेल्वे सुरक्षा बल ठाणे प्रभारी), संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र इंगळे, इजी.सतीश हातोले, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संस्थेच्या सचिव प्रतीक्षा वासनिक इंगळे, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. शिक्षण, समाजसेवा, आरोग्य, पत्रकारिता, कला, सांस्कृतिक, कृषी, उद्योग, महिला सक्षमीकरण तसेच विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ५०पेक्षा व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे सांगितले. अशा पुरस्कारांमुळे समाजात सकारात्मक कार्य करणाऱ्यांना नवी ऊर्जा मिळते, असेही त्यांनी नमूद केले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक व जनकल्याणकारीउपक्रमांची माहिती देत, भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा मानस व्यक्त केला. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, पुरस्कारार्थी, नागरिक व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन हर्षदा डोंगरे व आभार प्रदर्शन सतीश हातोले यांनी केले.
0 टिप्पणियाँ