इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये एमराल्ड हाइट्स स्कूल, राऊतवाडी शाखेचा विद्यार्थी ओम नंदकिशोर पाचपोल याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे शाळा व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने, मुख्याध्यापकांनी, शिक्षकवृंदांनी व पालकांनी त्याचे अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार शिक्षण व आवश्यक मार्गदर्शन देण्याची शाळेची परंपरा यापुढेही कायम राहील, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. विद्यार्थ्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली आहे.
0 टिप्पणियाँ