Ticker

6/recent/ticker-posts

मुर्तिजापुरात सोमवारी 'पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावायुवक-युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी१३१ पदे भरणार

मुर्तिजापुरात सोमवारी 'पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

युवक-युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी
१३१ पदे भरणार
अकोला, दि. ८ : नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित युवक-युवतींसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला, मॉडेल करिअर सेंटर, अकोला आणि श्री. गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १३ जुलै रोजी 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. त्यात १३१ पदे भरली जाणार आहेत.

हा मेळावा मूर्तिजापूर येथील श्री. गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मेन रोड येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पार पडेल.


**थेट मुलाखतीतून संधी**
या रोजगार मेळाव्यात नामवंत खासगी कंपन्या आणि उद्योगसमूहांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेणार आहेत. पात्र ठरलेल्या उमेदवारांना जागीच नोकरीची संधी मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या प्रमुख आस्थापनांमध्ये 
एमईबी फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड,पियाजियो व्हिईकल्स प्रा.लि., बारामती, 
 क्वेस कॉर्प लिमिटेड, पुणे,
 स्पंदन स्फूर्ती फायनान्स लि., यवतमाळ, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्री लि., जळगाव यांचा समावेश आहे.
**नोंदणी प्रक्रिया**
इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन 'जॉब सीकर' पर्यायाद्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर 'जॉब फेअर' पर्यायात अकोला जिल्हा निवडून संबंधित मेळाव्यासाठी 'अप्लाय' करावे आणि रजिस्ट्रेशन स्लिपची प्रिंट सोबत ठेवावी.
**आवश्यक सूचना**
उमेदवारांनी मेळाव्याच्या दिवशी स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री. प्रफुल्ल सु. शेळके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी (०७२४) २४३३८४९ या क्रमांकावर किंवा akolarojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ