Ticker

6/recent/ticker-posts

गोमाता सन्मान दिवस माजी विद्यार्थी संघाच्या वतीने उत्साहात साजरा.

गोमाता सन्मान दिवस माजी विद्यार्थी संघाच्या वतीने उत्साहात साजरा..... 
स्थानिक,  अकोला  टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर शाळेत गोरक्षण मध्ये गोमाता सन्मान दिवसाचे आयोजन टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर शाळा माजी विद्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आले . यावेळी सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करून, गोरक्षणला माजी विद्यार्थी संघाच्या वतीने गोरक्षण उपयोगी साहित्याचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  श्री बी चंद्रकांत रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अकोला हे होते यावेळी बी चंद्रकांत रेड्डी साहेब यांनी मार्गदर्शनपर बोलताना म्हणाले की गाय ही कामधेनु आहे गाय वाचवणे व गाईचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यावेळी गाय वाचवा देश वाचवा हा संदेश रथावर लावण्यात आला होता. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली त्यानंतर प्रचाराथाची गावातून फेरी मारण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिगंबर वनारे  माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष हे होते कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे  मुख्याध्यापक संध्या भटकर, कोल्हे सर, ठाकरे मॅडम उमेश मसने, बानुवाकोडे महाराज प्रकाश मालगण, सुनील भातुलकर, अरुण धनभर, रवी वानखडे, शरद इंगोले, गजानन हातेकर, शैलेश ओळंबे, नितीन वर्गे, प्रविण वनारे, विनोद इंगळे, माधव चावरे, संतोष गावंडे, ज्ञानेश्वर बानूबाकोडे, शैलेश मानकर, पंकज काळे, शंकर कपले, स्वपिल ढोरे  गुडडू अत्तर कार, गोलू अमृतकर, वडगावकर मॅडम, दीपक पळसपगार, विजय मेश्राम, इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघाच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले...

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ