Ticker

6/recent/ticker-posts

संभाजी ब्रिगेड महानगर अकोला व सेवा बहुउददेशिय संस्था च्या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद ==शासकीय योजनेतुन मिळणारे फायदे यासाठी अनेक कार्यक्रम राबविण्याची गरज पो.नि लेवलकर

संभाजी ब्रिगेड महानगर अकोला व सेवा बहुउददेशिय संस्था च्या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद 
==शासकीय योजनेतुन मिळणारे फायदे यासाठी अनेक कार्यक्रम राबविण्याची गरज 
                    पो.नि लेवलकर
अकोला :- ता.२८/०५/२०२६ रोजी गायत्री नगर, अकोला येथे संभाजी ब्रिगेड महानगर अकोला व सेवा बहुउददेशिय संस्था, अकोला यांचे संयुक्त विद्यमाने भव्य कार्ड, व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम तसेच एनसीएमसी कार्ड, आभा कार्ड, राशन कार्ड, आयुष्यमान कार्ड, ब्लड रिपोर्ट, इत्यादी चे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले असुन, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मा. श्री. नितीनजी लेवलकर, जुने शहर पोलिस निरीक्षक हे होते. सर्वप्रथम पोलिस निरीक्षक नितीनजी लेवलकर यांच्या हस्ते महामानव छत्रपती श्री. शिवाजी महाराज, माता जिजाऊ, राजे संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पन करण्यात आले व दिप प्रज्वलीत केले.यावेळी प्रमुख पाहुण्यांनी महामानवांना वंदन करून विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजक हर्षल इंगळे यांनी केले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ रणजीत कोरडे सर, डॉ अशोक पटोकार, नगर सेवक राहुल धोटे, श्रीमती माधुरी क्षिरसागर, नगरसेविका, मा. नगरसेविका रंजना ताई विंचनकर,देवाभाऊ गावंडे, संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष, सुधिर कहाकर समाजसेवक, दिपाताई दोरकर, मीनाताई लांडे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी शासकीय योजना मार्गदर्शन करून विचार व्यक्त केले. व सर्व कार्ड आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी  हर्षल इंगळे यांनी चांगले आयोजन केले त्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले
यावेळी कार्यक्रमांमध्ये विशाल आगरकर, अमोल वानखडे, संतोष वक्टे, योगेश लांजेवार, दिपक परळीकर, वेदांत साखरे, किसन दोरकर, अपुर्वा लांडे, सहकार्य व परिश्रम लाभले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन देवानंद ज. अंभोरे, यांनी केले असुन स्वागत गित शाहीर गणेश इंगळे यांनी सादर केले. आभार प्रदर्शन हर्षल इंगळे यांनी केले.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ