Ticker

6/recent/ticker-posts

४१ व्या ऑल इंडिया कराटे स्पर्धेत अकोल्याच्या खेळाडूंची सुवर्ण कामगिरी

४१ व्या ऑल इंडिया कराटे स्पर्धेत अकोल्याच्या खेळाडूंची सुवर्ण कामगिरी
अकोला, प्रतिनिधी :
दि. २६ मे ते २९ मे २०२६ दरम्यान मसुरी, उत्तराखंड येथे SKSI यांच्या वतीने सिहान लाल दरदा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ४१ व्या ऑल इंडिया कराटे स्पर्धेत अकोल्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
अकोला येथील महाराष्ट्र स्टॉग शोतोकान स्पोर्ट्स कराटे-डो ऑर्गनायझेशन इंडियाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत पदकांची कमाई केली. यामध्ये सूर्यवीर चोपडे याने ६ वर्षांखालील वयोगटात कुमिते (फाईट) प्रकारात सुवर्णपदक तर काता प्रकारात रौप्यपदक पटकाविले. तसेच अगस्त्य खीरेकर याने १० वर्षांखालील वयोगटात कुमिते (फाईट) प्रकारात सुवर्णपदक व काता प्रकारात कांस्यपदक मिळवून अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या उल्लेखनीय यशामुळे अकोला जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. सुहासिनीताई संजयभाऊ धोत्रे, जिल्हा क्रीडा अधिकारी मा. सतीशचंद्र भट, जिल्हा क्रीडा परिषद सदस्य मा. सय्यद जावेद अली, महाराष्ट्र अमॅच्युअर कराटे असोसिएशनचे अध्यक्ष सिहान अरुण सारवान, महासचिव मा. वासुदेव वाघ पाटील, उपाध्यक्ष मा. गणेश भिरड तसेच स्टॉग शोतोकान स्पोर्ट्स कराटे-डो ऑर्गनायझेशन इंडियाच्या महाराष्ट्र प्रतिनिधी डॉ. सेन्साई खुशबू चोपडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक डॉ. सेन्साई खुशबू चोपडे तसेच आपल्या आई-वडिलांना दिले.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ