अकोला -: दिनांक 27/04/2026 पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथील क्षयरोग व छातीरोग विभाग अंतर्गत वार्ड क्रमांक 15 (आय.सी.यु) मध्ये एक अनोळखी पुरुष रुग्ण देवराव किसन कात्रे वय 55 वर्ष रुग्णालय नोंदणी क्रमांक 344754 असून राहणार व्याळा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला असा पत्ता सांगत आहे, गंभीर परिस्थितीमध्ये रुग्णाला एका व्यापाऱ्याने अपघात विभागामध्ये उपचाराकरिता भरती केले. परंतु अजूनतरी कोणीही नातेवाईक किंवा ओळखीचे कोणी रुग्णाची ओळख पटविण्यासाठी पुढे आलेले नाहीत. सदर रुग्णाची कोणालाही ओळख पटल्यास किंवा नातेवाईक असल्यास त्यांनी रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे (8380830182) यांच्याशी संपर्क करावा. माननीय अधिष्ठाता डॉ.संजय सोनुने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्यामकुमार सिरसाम सर यांच्या देखरेखीमध्ये क्षयरोग व छाती रोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ.सदानंद भिसे सर, डॉ.पियुष गुप्ता सर, डॉ.मोहम्मद जाहिद, डॉ.राहुल वाघमारे, डॉ. ऋषभ पाडोल, डॉ.खुशबू दुबे, डॉ.शिवकिरण हे रुग्णावर उपचार करीत आहेत. वार्ड परिसेविका अनिता बागडे परिचारिका वैशाली चव्हाण, चेतना तितरमारे, अश्विनी काटेकर, शुभम गायकवाड कक्षसेवक अमोल मुळे व सफाईकामगार सुरज हे रुग्णाची परिचर्या, देखभाल व काळजी घेत आहेत. सदर अनोळखी रुग्णाचे नातेवाईक शोधल्यावर किंवा पुढे आल्यावर रुग्णाचे डिस्चार्ज दरम्यानचे मेडिकल सोशल वर्कची कामे, पुनर्वसन, मदत व समन्वय करण्याचे कामकाज समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे करतील तसेच त्यांना मेडिकल सोशल वर्कर अमित मिटकरी, तन्मय बांगर हे मदत करीत आहेत.
0 टिप्पणियाँ