Ticker

6/recent/ticker-posts

पारस वीज निर्मिती केंद्रातील अपघात प्रकरणी वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी ह्यांची अधिक्षक अभियंता ह्यांची भेट.=जखमींना आर्थिक मदत आणि संपूर्ण प्लांटचे सेफ्टी ऑडिट ची मागणी.

पारस वीज निर्मिती केंद्रातील अपघात प्रकरणी वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी ह्यांची अधिक्षक अभियंता ह्यांची भेट.
=जखमींना आर्थिक मदत आणि संपूर्ण प्लांटचे सेफ्टी ऑडिट ची मागणी.
अकोला:-पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे २३ मे रोजी झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले असून जखमी मजुरांचे कुटुंबाला तातडीने आर्थिक सहाय्य देण्यात यावे आणि संपूर्ण प्लांटचे सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे वतीने करण्यात आली.

पारस थर्मल पॉवर स्टेशन येथील कोल मिल मध्ये गंभीर अपघात झाला.त्या मध्ये शेख याकूब शेख रऊफ रा पारस हा ६०%  भाजल्या गेला आणि कांचन दिगोळे रा उरळ याच्या मणक्या मध्ये फॅक्चर झाले या दोन्ही कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्या साठी अधिक्षक अभियंता भगत यांची भेट राजेंद्र भाऊ पातोडे महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य ह्यांचे नेतृत्वात आम्रपाली खंडारे जिल्हा अध्यक्ष्या वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्हा आणि पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेतली.दोघांच्या उपचार आणि  झालेल्या घटनेची माहिती घेतल्या नंतर पुढील काळात अपघात टाळण्यासाठी कामगाराच्या सुरक्षे बाबत त्वरित उपाय योजना करण्याचे सांगितले.तसेच संपूर्ण प्लांटचे सेफ्टी ऑडिट आणि आर्थिक मदत देण्या बाबत मागणी केली.त्यावर अधिक्षक अभियंता ह्यांनी तातडीने आर्थिक मदतीचे आदेश देऊन सेफ्टी ऑडिट करून घेण्याचे मान्य केले.
ह्यावेळी अविनाश खंडारे बाबू मेंबर, किशोर खंडारे, मुकेश लोडगे, कुर्शीद राणा, अश्विन खंडारे, रणदीप खंडारे, हमीद टेलर नरेश चावरिया नागेश वानखेडे नितीन मोहोड अजय राजनकर रामा लांडे सोनू लांडे आकाश खंडारे पवन तायडे रुतिक खडारे गोलू खंडारे सागर नाकर पवन खंडारे अश्विन अघमकर नयना ताई मोरे अणू ताई शिरसाठ सारिका वानखेडे सुसतकार ताई मुकेश खंडारे प्रामुख्याने उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ