राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार सामाजिक न्याय विभागात 1 वर्षात 5 हजार प्रशिक्षित कार्यकर्ते नेमणार ---- पंडित कांबळे
--- नागपूर विभाग व अमरावती ची बैठक संपन्न
अकोला:-विदर्भ विभागातील अमरावती विभाग व नागपूर विभागाच्या आढावा बैठक मा पंडित कांबळे ( प्रदेशाध्यक्ष ) सामाजिक न्याय विभाग यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.
विदर्भ विभाग सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विभागीय आढावा बैठका घेतल्या जात आहेत आत्तापर्यंत 1) पश्चिम महाराष्ट्र विभाग 2) मराठवाडा विभाग 3)अमरावती विभाग 4) नागपूर विभागाच्या आढावा बैठका संपन्न झाल्या आहेत आगामी काळात कोकण विभाग व दक्षिण महाराष्ट्र विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
आगामी काळात होणाऱ्या 22 जिल्हा परिषदा व पंचायत समिती च्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकाणची तयारी करण्यासाठी तसेंच 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी आढावा बैठका घेतल्या जात आहेत.
स्यानिक स्वराज्य संस्था मध्ये सामाजिक न्याय विभागा मध्ये 5 हजार नवीन प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करणार आहोत नगरपरिषद नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण ग्रामपंचायत स्तरावर प्रमुख म्हणून नवीन पदाधिकारी नेमण्याचे काम विविध जिल्ह्यात तालुक्यात काम सुरु झाले आहे येत्या 1 वर्षात सामाजिक न्याय विभागात 5 हजार कार्यकर्ते नेमणार आहोत.
ग्रामीण भागाच्या राजकारणात आपला पाया भक्कम करण्यासाठी व आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी नवीन पदाधिकारी नेमणार आहोत
.... महाराष्ट्र मध्ये निम्मी जनता ग्रामीण भागात राहते ग्रामीण भागातील पदाधिकारी यांचे नेतृत्व मजबूत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये नवीन पदाधिकारी नेमून गाव खेडे वाड्या वस्त्या पर्यंत सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी पोहचणार आहेत
विदर्भ विभागातील अमरावती विभाग व नागपूर विभागाच्या आढावा बैठकीत सामाजिक न्याय विभागाचे मा पंडित कांबळे ( प्रदेशाध्यक्ष ), प्रकाश गजभिये ( मा आमदार ), मा अरुण धर्माळे ( उपाध्यक्ष ),मा संजय गायकवाड (उपाध्यक्ष ),मा रवीभाऊ खिलारे (प्रदेश उपाध्यक्ष ),मा बाबासाहेब घुमरे ( प्रदेश संघटक सचिव ),मा डॉ राजपाल भगत ( संघटक सचिव ), मा गजानन भटकर,मा शामराव वावहूरवाघ,मा गौतम कांबळे,मा सुनिल वणारे,मा राजेश फुले, हेमंत देशमुख साहेब,दुनिश्वर पेठे,वेद प्रकाश आर्या,शेखर पाटील, बाबुराव येरणे, संजय कोचे, एन्दपाल गेडाम,राकेश शयाम कुवर, देवेंद्र तागडे, प्रमिला रामटेके, राजेश आधाव,,नंदकुमार माटे, मा कोकिळाताई वाहूरवाघ, दीपमाळा खाडे, कुमुद पाचपोर, कुणाल गायकवाड,पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पणियाँ