Ticker

6/recent/ticker-posts

४१ वी ऑल इंडिया कराटे स्पर्धेसाठी अकोल्याच्या खेळाडूंची निवड

४१ वी ऑल इंडिया कराटे स्पर्धेसाठी अकोल्याच्या खेळाडूंची निवड
अकोला :
दि. २६ मे ते २९ मे २०२६ दरम्यान मसुरी, उत्तराखंड येथे SKSI यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४१ व्या ऑल इंडिया कराटे स्पर्धेसाठी अकोला येथील महाराष्ट्र स्टॉग शोतोकान स्पोर्ट्स कराटे-डो ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत १० वर्षांखालील गटात काता व कुमिते (फाईट) प्रकारासाठी खेळाडू सूर्यवीर चोपडे व अगस्त्य खीरेकर यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे अकोला जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. सुहासिनी ताई संजयभाऊ धोत्रे, जिल्हा क्रीडा अधिकारी मा. सतीशचंद्र भट,जिल्हा क्रीडा परिषद सदस्य मा. सय्यद जावेद अली , अध्यक्ष महाराष्ट्र अमॅच्युअर कराटे असोसिएशन सिहान अरुण सारवान,महासचिव महाराष्ट्र अमॅच्युअर कराटे असोसिएशन मा. वासुदेव वाघ पाटील , उपाध्यक्ष महाराष्ट्र अमॅच्युअर कराटे असोसिएशन मा. गणेश भिरड, तसेच महाराष्ट्र प्रतिनिधी, स्टॉग शोतोकान स्पोर्ट्स कराटे-डो ऑर्गनायझेशन इंडिया चे डॉ. सेन्साई खुशबू चोपडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक डॉ. सेन्साई खुशबू चोपडे तसेच आपल्या आई-वडिलांना दिले आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ