Ticker

6/recent/ticker-posts

अकोला महापालिका क्षेत्रात ‘आपले सरकार सेवा केंद्र’साठी अर्ज मागविले

अकोला महापालिका क्षेत्रात ‘आपले सरकार सेवा केंद्र’साठी अर्ज मागविले
अकोला, दि. 25 : जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने अकोला महानगरपालिका क्षेत्रातील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालविण्यासाठी एकूण 21 केंद्रांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत विविध प्रभागांमध्ये रिक्त असलेल्या केंद्रांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, इच्छुक उमेदवारांनी दि. 27 एप्रिल ते 8 मे 2026 या कालावधीत अधिकृत संकेतस्थळ www.akola.gov.in वरून अर्ज डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 8 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर मुलाखत प्रक्रिया 4 व 5 जून 2026 रोजी पार पडणार आहे. अंतिम निवड यादी 10 जून 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून, किमान 12 वी उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान (MSCIT/CCC) आणि मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच, संबंधित प्रभागातील रहिवासी असणे आवश्यक आहे. याशिवाय, अर्जासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे आणि पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. इच्छुकांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ