दिनांक 14/04/2026 पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथील सर्जरी विभाग अंतर्गत वार्ड क्रमांक 12 मध्ये एक बेघर वयोवृद्ध रुग्ण गोविंद ढवळे वय अंदाजित 72 वर्ष रुग्णालय नोंदणी क्रमांक 655013 असून राहणार चिखली जिल्हा बुलढाणा येथील पत्ता सांगत आहे, सदर रुग्णाला मातोश्री वृद्धाश्रम शिवापूर येथून उपचारासाठी GMC अकोला येथे भरती केले होते. सध्या रुग्णाची तब्येत चांगली झाली आहे व उपचारपण पूर्ण झालेले आहेत आणि रुग्ण डिस्चार्ज साठी रेडी आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. परंतु अद्याप पर्यंत कोणीही त्यांचे नातेवाईक रुग्णाची ओळख पटवण्यासाठी आणि घरी नेण्यासाठी पुढे आलेले नाहीत. सदर रुग्णाची कोणालाही ओळख पटल्यास किंवा नातेवाईक असल्यास त्यांनी सर्वोपचार रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे (मोबाईल क्रमांक 8380830182) यांच्याशी किंवा वार्ड 12 मध्ये संपर्क करावा. माननीय अधिष्ठाता डॉ.संजय सोनुने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्यामकुमार सिरसाम सर यांच्या देखरेखीमध्ये रुग्णालयातील सर्जरी विभागाचे विभाग प्रमुख तथा पथक क्रमांक 2 चे पथक प्रमुख डॉ.अरविंद आडे सर आणि डॉ.राजेश चिंचोलकर सर, डॉ.अवनीश देशमुख, डॉ.अभिजीत बंकुवाले, डॉ.सिदार्थ सिंग बघेल, डॉ.पसूला प्रणितकुमार यांनी रुग्णावर उपचार पूर्ण केला आहे. वार्ड परिसेविका श्रीमती सुनीता सैतवाल, वंदना मोरे परिचारिका शिल्पा शिरसाट, नम्रता गोमासे, किरण श्रीराव, प्रीती आगरे, रेश्मा शेख, रक्षा जाधव, सुशील मेट तसेच कक्षसेवका विश्रांती कांबळे, सफाईकामगार बबलू दावत हे रुग्णाची देखभाल व काळजी घेत आहेत. सदर अनोळखी रुग्णाचे नातेवाईक पुढे आल्यावर रुग्णाचे डिस्चार्ज दरम्यान चे पुनर्वसन, मदत व समन्वय करण्याचे कामकाज समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे करतील.
0 टिप्पणियाँ