अकोला -: दिनांक 17/05/2026 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथील वार्ड क्रमांक 31मध्ये प्रकाश घुगे राहणार रिसोड जिल्हा वाशीम पुरुष रुग्ण वय अंदाजित 54 वर्ष रुग्णालय नोंदणी क्रमांक 20260064621 यांच्यावर मेडिसिन विभाग अंतर्गत वार्ड क्रं. 31 मध्ये उपचार सुरू आहे. रुग्णाला पत्नी व मुलगा आहे पण ते रुग्णांजवळ येत नाहीत. परंतु अजूनतरी कोणीही नातेवाईक किंवा ओळखीचे कोणी रुग्णाची ओळख पटविण्यासाठी पुढे आलेले नाहीत. सदर रुग्णाची कोणालाही ओळख पटल्यास किंवा नातेवाईक असल्यास त्यांनी सर्वोपचार रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे (8380830182) यांच्याशी संपर्क करावा. माननीय अधिष्ठाता डॉ.संजय सोनुने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्यामकुमार सिरसाम सर यांच्या देखरेखीमध्ये मेडिसिन विभागाचे विभाग प्रमुख डॉ.मुकुंद अष्टपुत्रे सर, डॉ.सुनिता आडे मॅडम, डॉ.उदित लड्डा, शेखर सोळंखे, डॉ.सोहम कामत, डॉ.मनीष कासपटे हे रुग्णावर उपचार करीत आहेत. वॉर्ड परिसेविका श्रीमती मनीषा सोळंके, गौरी अढाव, तृप्ती येवले, पूजा चिंचोळकर, मेघा तुपाडे, सरिता जाधव, प्रतीक्षा वैराळे, प्रिया नवनागे तसेच कक्षसेवका छाया वाहूरवाघ, मंगला खवले, अनुप जाधव हे रुग्णाची देखभाल व काळजी घेत आहेत. सदर बेवारस रुग्णाचे नातेवाईक पुढे आल्यावर रुग्णाचे डिस्चार्ज दरम्यानचे सोशल वर्कची कामे, पुनर्वसन, मदत व समन्वय करण्याचे कामकाज समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे हे करतील.
0 टिप्पणियाँ