Ticker

6/recent/ticker-posts

अकोला क्रीडा प्रबोधिनीचा बॉक्सर गोपाल गणेशे भारतीय संघातउझबेकिस्तान मध्ये होणार एशियन बॉक्सिंग स्पर्धा

अकोला क्रीडा प्रबोधिनीचा बॉक्सर गोपाल गणेशे भारतीय संघात
उझबेकिस्तान मध्ये होणार एशियन बॉक्सिंग स्पर्धा
अकोला:-आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात भारताची ताकद पुन्हा एकदा झळकणार आहे.एशियन U-15 & U-17 मुले/मुली बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा उझबेकिस्तान 2026 या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला. एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप ताश्कंद, उझबेकिस्तान असून, महाराष्ट्राच्या जिगरबाज बॉक्सर गोपाल रामेश्वर गणेशे याने राष्ट्रीय संघात धडक मारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दि. 1 ते 16 मे 2026 दरम्यान ताश्कंद, उझबेकिस्तान येथे होणाऱ्या या स्पर्धेत गोपाल भारताचा झेंडा उंचावण्यासाठी सज्ज झाला आहे. कठोर परिश्रम, आक्रमक खेळशैली आणि अचूक पंचिंगच्या जोरावर त्याने प्रतिस्पर्ध्यांना नेहमीच चितपट केले आहे.

स्पर्धेपूर्व भारतीय संघाचे विशेष प्रशिक्षण शिबीर पटियाला येथे 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडले. या शिबिरात खेळाडूंना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तांत्रिक, शारीरिक व मानसिक तयारी करून घेण्यात आली. गोपालने या शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करत प्रशिक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
राष्ट्रीय निवड ही केवळ एक संधी नसून, ती जबाबदारीही आहे—आणि गोपाल त्या जबाबदारीला समर्थपणे न्याय देईल, असा विश्वास क्रीडावर्तुळातून व्यक्त होत आहे. आता त्याच्या प्रत्येक पंचमध्ये भारताची ताकद दिसणार आहे.
ताश्कंदच्या रिंगमध्ये गोपाल गणेशेचा घणाघाती खेळ पाहायला मिळणार असून, पदक जिंकून तो भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवेल, अशी जोरदार अपेक्षा आहे. महाराष्ट्राचा हा दमदार खेळाडू आता आशियाई पातळीवर इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला आहे.
या यशाबद्दल आदरणीय वर्षा मीना मॅडम,जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, क्रीडा सहाय्यक संचालक श्री. सुधीर मोरे,उपसंचालक अमरावती विभाग श्री शेखर पाटील, क्रीडा आयुक्त श्रीमती शीतल तेली उगले, क्रीडापीठ उपसंचालक माणिक पाटील,सर्व क्रीडाप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ