लोकन्यायालयात २ हजार ८७२ प्रकरणे निकाली
९ कोटी ३७ लाख ७८ हजार ५३० रुपयांची तडजोड
अकोला, दि ९: राष्ट्रीय,राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार अकोला जिल्हयातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबीक न्यायालय, औद्योगिक न्यायालय व जिल्हा ग्राहक तक्रार आयोग येथे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले.
अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालयात ११ हजार ३९८ प्रकरणे राष्ट्रीय लोक न्यायालयात तडजोडीकरीता ठेवण्यात आली होती. त्यापैकी एकुण १ हजार ३५८ अशी एकूण प्रलंबित प्रकरणात व एकुण १ हजार ५१८ दाखलपुर्व प्रकरणात समेट घडुन आला. २ हजार ८७२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये मुख्यत्वे दिवाणी, फौजदारी, वैवाहीक वाद स्वरूपाची तसेच मोटार वाहन अपघात प्रकरण व कलम १३८ एन.आय. अॅक्ट आणि आगपंचायतचे घरपट्टी/पाणीपट्टी बँकांची खटलापूर प्रकरणात तडजोड होउन रक्कम रूपये ९ कोटी ३७ लाख ७८ हजार ५३० रूपयेची तडजोड झाली. आपसी सहमतीने घटस्फोट घेणारे पती-पत्नी चे ३ जोडपे नांदण्याकरिता गेले. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे एका प्रकरणामध्ये पती पत्नी गध्ये असलेल्या वादाबाबत मागील अनेक वर्षापासून प्रकरणे प्रलंबित होती ती प्रकरणे लोकन्यायालयाच्या माध्यमातून निकाली निघाली. तसेच मॅक्टचे प्रकरणे देखील गोठ्या प्रगाणात निकाली निघाली. लोकन्यायालयाच्या माध्यमातुन अनेक प्रकरणे समोपचाराने मिटवली जात आहेत हा समाजाला एक खुप मोठा चांगला संदेश जात आहे.
लोक न्यायालय यशस्वी होणेकरीता ए. डी. क्षीरसागर, प्रभारी अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, तसेच दि. शं. दाभाडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला यांचे बहुगुल्य मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हयात कार्यरत सर्व न्यायाधिश, न्यायालयीन कर्मचारी, वकील बूंद यांचे योगदान लाभले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे यु. आर. वाडेगावकर, अधिक्षक, पी.एम. बलिंगे, राहा. अधिक्षक संजय व्ही. रामटेके, व.लि., पी.एल. भगेवार, कार्यालयीन सहायक वैभव ग.ताथोड, क.लि., व हरिष इंगळे, शिपाई, धिरज मारके शिपाई व इतर विधी सेवा प्राधिकरणाचे लिपीक आणि शिपाई तसेच लोकअभिरक्षक कार्यालयातील विधीज्ञ आणि न्यायीक कर्मचारी, विधी स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. सदर लोक अदालत यशस्वी पार पाडणेकरिता अकोला यार असोसिएशन तसेच पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद कार्यालय, अकोला, यांचे सहकार्य लाभले. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव/न्यायाधिश दि. शं. दाभाडे यांनी दिली,
0 टिप्पणियाँ