Ticker

6/recent/ticker-posts

टि.सा.स.मं.शाळेतील गोरक्षण परिसरामध्ये अत्यंत दुर्मीळ असलेला मांडुळ या जातीचा साप आढळुन आला

आज दिनांक:- १२/५/२६  रोजी सकाळी ०९ वाजता. टि.सा.स.मं.शाळेतील गोरक्षण परिसरामध्ये अत्यंत दुर्मीळ असलेला   मांडुळ या जातीचा साप आढळुन आला. या सापाला माजी विद्यार्थी संघाने पकडुन जीवदान दिले. यामध्ये विशेष परिश्रम माजी विद्यार्थी संघामधील शरद इंगोले यांनी मोठया शिताफीने यासापाला पकडले त्यांना मदत म्हणुन दिगंबर वनारे, उमेश मसने, सुनील भातुलकर, प्रमोद टाले, संजय पळसपगार, देवानंद ईंगळे, गुड्ड अत्तरकार, गोलु अमृतकर तसेच ईतर माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. त्या नंतर या सापाला वनपरिक्षेत्र कार्यालय, अकोला येथील कार्यालयात तेथील कर्मचारी तसेच सर्प मित्र श्री.बाळ काळणे व श्री.अवारे यांचे स्वाधीन केले.  याबाबत सर्वच स्तरावरून माजी विद्यार्थी संघाचे कौतुक होत आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ