एच.पी.समर्थ गॅस एजन्सीचे गॅस ग्राहक डाटा दुस-या 4 एच.पी.गॅस एजन्सीमध्ये वर्ग केल्याबाबत.
एच.पी.समर्थ गॅस एजन्सी अकोला शहर,जि.अकोला, एच.पी.सी.एल. कंपनीचे श्री.अथर्व पानसरे, गॅस विक्रि अधिकारी अकोला यांचे मार्फत बंद केलेली आहे. त्यामुळे गॅस ग्राहक नागरिकांची गैरसोय होऊ नये त्याकरीता आवश्यक उपाय योजना करून गॅस सिलेंडर पुरवठा, उपलब्धता, गॅस वितरण सुरळीत होणे आवश्यक आहे. त्याकरीता (समर्थ गॅस एजन्सीचा gas customer transfer online data ) दुस-या एच.पी.गॅस एजन्सींना सर्व गॅस ग्राहक ऑनलाईन डाटा वर्ग करण्यात आलेले आहे.
दि.11/05/2026 रोजी पासून एच.पी.समर्थ गॅस एजन्सीतील गॅस ग्राहक नविन क्रमांकासह ऑनलाईन डाटा (gas customer transfer online data ) वर्ग करण्यात आलेला असून एजन्सी निहाय डाटा वर्ग करण्यात आलेला आहे. तो खालिलप्रमाणे –
अ.क्र.
एच.पी. गॅस एजन्सीचे नाव पत्ता
1
एच.पी.यदुराज गॅस सर्विस, गोरक्षण रोड, शॉप नं.7 बी.,आय.टी.स्केअर, टायटन शो रूम जवळ, अकोला शहर
2
एच.पी.पटेल गॅस सर्विस, शासकीय आय.टी.आय.कॉलेज समोर, नविन बस स्टॅन्ड मागे, महसूल कॉलनी जवळ, अकोला शहर,
3
एच.पी.विजय गॅस सर्विस, सिंधी कॅम्प, अकोला शहर,
4
एच.पी. अकोला गॅस सर्विस रतनलाल प्लॉट चौक, अजहर हुसैन कॉलेज, सॅमसंग मोबाईल गॅलरी जवळ, अकोला शहर.
गॅस ग्राहक नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, नमुद गॅस एजन्सीमध्ये गॅस ग्राहक डाटा पुरविण्यात आलेला असून कार्यालयात कोणीही गर्दी करू नये, गॅस सिलेंडर बुकींग करीता नमुद गॅस एजन्सीमध्ये संपर्क करावा.
0 टिप्पणियाँ