Ticker

6/recent/ticker-posts

शिरताळा येथे श्रीमद भागवत कथा व हरिनाम सप्ताहाची सांगता

शिरताळा येथे श्रीमद भागवत कथा व हरिनाम सप्ताहाची सांगता
अकोला :- मुर्तिजापुर तालुक्यातील शिरताळा येथे दरवर्षी प्रमाने याही वर्षी श्री महंत १००८सिताराम महाराज यांच्या कृपेने व श्री वै . समर्थ सदगुरु श्रीराम महाराज मेहुणकर यांच्या जन्मशताब्दी निमित्य श्रीमद भागवत कथा व हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 
गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह हनुमान मंदीर शिरताताळा येथे पार पडला आहे. या आध्यात्मीक सोहळ्याचा शुभारंभ शनीवार ९ मे रोजी तर सांगता शनीवार १६ मे रोजी झाली आहे. सप्ताहाचे व्यासपीठ नेतृत्व ज्ञानेश्वर महाराज कळंबेश्वर यांनी केले. शुक्रवार १५ मे रोजी गावातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. शनीवार १६ मे रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत सप्ताहाचे व्यासपीठ नेतृत्व गुरुवर्य तुकाराम महाराजा सखारामपुरकर यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर १२ ते ५ वाजेपर्यत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रयादा चे अन्न दाते लखन खेमराज यादव हे होते. सप्ताहात सोपान महाराज डिक्कर. ज्ञानेश्वर महाराज लाहुळकर. गजानन महाराज गोंडचवर,हरिओम महाराज सोनोने, गणेश महाराज कराळे, अवीनाश महाराज खोकले आदिंनी आपली सेवा अर्पन केली.
ग गायनाचार्य विष्णू महाराज रावणकार, गणेश महाराज देशमुख, टाळकरी मंडळी शिरताळ, बोर्टा. गुंजवाडा आदींनी आपली सेवा दिली. सप्ताहा कार्यक्रम यशस्वी करण्या करीता आयोजक उद्वव भोपळे,माधव भोपळे,गोपाल बांबल,ओम बांबल,संजय थेटे, रोहीत मालठाने, रमेश चरपे, ज्ञानेश्वर चरपे,योगेश बांबल, सतिष कडू,रामदास बांबल, क्रिष्णा बांबल,सतीष बांबल, हर्षल भोपळे गावतील महीला पुरुष यांनी परिश्रम घेतले.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ