आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी केली ग्राम तरोडावासियांची स्वप्नपूर्ती
अकोट :- महाराष्ट्रातील अभ्यासू नेतृत्व व अकोला पूर्वचे लोकप्रिय आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी ग्राम तरोडा येथे पूल उभारून दिल्यामुळे पावसाळ्यापूर्वीच ग्राम तरोडावासियांची मोठी समस्या सुटली आहे.
त्याचे असे झाले की,अकोला पूर्व मतदार संघातील ग्राम तरोडा येथे स्मशानभूमी लगतच्या नाल्याला पावसाळ्यात पूर येत असल्यामुळे ग्रामवासियांना आवा गमन करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत होते.ग्रामवासियांनी ही समस्या आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या कानावर घातली.त्याप्रसंगी गावकऱ्यांनी त्या नाल्यावर एका सिमेंटच्या रपट्याची मागणी केली होती.परंतू ही समस्या कायमस्वरूपी सुटावी म्हणून आमदार महोदयांनी प्रशासनाला सिमेंट रपट्या ऐवजी थेट पुलासाठीच अंदाजपत्रक तयार करायला लावून त्यानंतर शासकीय निधी उपलब्ध करून दिला.पुढे काम पूर्णत्वास जाऊन हा पूल देखील तयार झाला.कधीकाळी पूलाचे पाहिलेले स्वप्न आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्यामुळे पूर्ण झाले.
गावकऱ्यांनी नव्या पुलाची निर्मिती बघून करून समाधान व आनंद व्यक्त केला व आमदार रणधीरभाऊ सावरकर यांचे आभार मानलेत
0 टिप्पणियाँ