गोरसेना विदर्भ अध्यक्ष पदी मनोहर राठोड तर अकोला जिल्हाध्यक्षपदी रतन आडे...
अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ता तथा गोरसेनेचे पदाधिकारी मनोहर राठोड यांची विदर्भ पदी निवड करण्यात आली रतन आडे यांची अकोला गोरसेना जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
बंजारा समाजाला दिशा देण्याचे आणि एकत्रित करण्याचे कार्य गोरसिकवाडी आणि गोरसेना देशभरात गेल्या अनेक दिवसांपासून करत आहे. हेच कार्य पुढं घेऊन जात अकोल्यातील मनोहर राठोड व रतन आडे गेल्या अनेक वर्षांपासून समाज कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत, गोरसिकवाडीचे राष्ट्रीय नेते आर सी चव्हाण, गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष प्रा संपत चव्हाण यांच्या उपस्तिथीत रतन आडे यांना वाशीम येथे झालेल्या गोरसिकवाडी-गोरसेनेच्या बैठकीत विदर्भ व अकोला जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. यावेळी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, तसेच महाराष्ट्र सहसंयोजक प्रा. अनिल राठोड सर, गोर सेना अमरावती विभागाचे अध्यक्ष सोनू चव्हाण, अकोला गोर सिकवाडीचे संयोजक प्रेमानंद राठोड, सहसंयोजक रविंद्र जाधव, बार्शिटाकळीचे सहसंयोजक डॉ विकाश राठोड, गोर सेना तालुका अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष अतिश राठोड, राहुल, अविनाश, शिवराज, दिपक, संदीप, गब्बा भाऊ, दिनेश तर पातूर ता. गोर सेना अध्यक्ष गणेश राठोड, अजाबराव राठोड , डॉ मंगेश चव्हाण यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पणियाँ