सन २०२१ च्या खरिप हंगामातील पेरणी केलेल्या पिकांच्या नोंदी घेण्याचें आदेश दया *,,,,,,,,,,,,,,, अन्यथा गाव तिथ आंदोलन करण्यात येईल (बुलढाणा) ; अनुसूचित जाती /जमातीच्या भूमिहीन बेघर लोकांनी महसुल व वन भूमीवर शेतीसाठी अतिक्रमण करून जीवनावश्यक जिननसाची पेरणी केली आहे सदर पिकांच्या नोंद घेण्यासाठी पटवारी व मंडळ अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार मंडळ निरिक्षक कर्तव्य व कामे नियम १९७० मधील नियम १७ प्रमाने जमिनीवर पेरलेला पिकांचा, पंचनामा, स्थल निरीक्षण प्रत्यक्ष मौका पाहणी करुन परतिवेदनातमक अहवाल सादर करून सन २०२१ च्या खरिप हंगामातील पेरणी केलेल्या पिकांच्या नोंदी घेणे आवश्यक आहे परंतु पटवारी व मंडळअधीकारी नोंदी घेण्यास टाळाटाळ करित असल्याने शेतात पिके आहेत परंतु रेकार्ड निरंक राहत असल्याने अतिक्रमण करणाऱ्या लोकांना पिकांच्या नुकसान भरपाई मिळत नाही म्हणून पिकांच्या नोंदी झाल्यास पिक विमा भरने सोईचे होईल असे मत मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे अध्यक्ष भाई जगदीश कुमार ईगळे यांनी प्रसिद्ध पत्रकातुन व्यक्त केले जर कारवाई झाली नाही तर मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेच्या वतीने गाव तिथ आंदोलन करण्यासाठी जिल्ह्यधीकारी कार्यालय बुलढाणा येथे निवेदन सादर करण्यात येईल असे मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे
0 टिप्पणियाँ