== खा.अनुप धोत्रे यांचा निवास स्थानी जाऊन ग्रामस्थांनी केला सत्कार
अकोला :- मुर्तिजापुर तालुक्यातील गट ग्राम पंचायत शिरताळा येथील ग्रामस्थ अनेक वर्षा पासुन सभामंडपाची मागणी करत होते. अनेक वेळा संबधीत प्रशासन व लोकप्रतिनिधीना निवेदने दिली. समाजसेवक संजय थेटे . पुरषोत्तम काका हेंडसकर. गावकरी मंडळी गेल्या दोन वर्षापासुन प्रयत्न करत होते. कर्तव्य दक्ष युवा खासदार अनुप धोत्रे यांनी गेल्या अनेक वर्षापासुन असलेली ग्रामस्थांची मागणी मान्य करुन शिरताळा गावास सभामंडप देण्यास मंजुरी दिली. त्यामुळे समाज सेवक संजय थेटे पुरुषोतम काका हेंडसकर गावतील नागरिक यांनी खा. अनुप धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट घेवून शाल व पुष्प गुच्छ देवून सत्कार केला. व आभार व्यक्त केले. या वेळी समाज सेवक संजय थेटे, पुरषोत्तम काका हेंडसकर, गणेश बांबल, अंजली बांबल, ज्योती वानखडे, छाया बांबल, थेटे ताई,गावतील महिला पुरुष उपस्थित होते.
0 टिप्पणियाँ