अकोला प्रतिनिधी -: दिनांक 14/05/2026 रोजी पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथील वार्ड क्रमांक 32 मध्ये एक अनोळखी पुरुष रुग्ण वय अंदाजित 30 वर्ष रुग्णालय नोंदणी क्रमांक 177701 यांच्यावर मेडिसिन विभाग अंतर्गत उपचार सुरु आहेत. रुग्ण स्वतःचे नाव ओमप्रकाश असे सांगतो, बाकीची आणखी माहिती पेशंट देत नाही आहे, फक्त डोळ्याने पाहतो, त्यामुळे नातेवाईकांची माहिती मिळत नाही आहे, रुग्ण झोपूनच आहे त्याला स्वतःचे काहीही करता येत नाही, पोस्ट ऑफिस चौकाजवळून अकोला शहर पोलीस गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी सदर रुग्णाला उपचारासाठी भरती केले आहे अशी माहिती मिळाली आहे, सदर रुग्णाची कोणालाही ओळख पटल्यास किंवा नातेवाईक असल्यास त्यांनी रुग्णाची ओळख पटविण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे (8380830182) यांच्याशी संपर्क करावा. माननीय अधिष्ठाता डॉ.संजय सोनुने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रवीण सपकाळ सर यांच्या देखरेखीमध्ये मेडिसिन विभागाचे विभाग प्रमुख डॉ.मुकुंद अष्टपुत्रे सर, डॉ.सुनिता आडे मॅडम, डॉ.उदित लड्डा, डॉ.शेखर सोळंखे, डॉ.प्रफुल ठाकरे, डॉ.शिल्पा इंगोले, डॉ.सोहम कामत, डॉ.मनीष कास्पटे हे रुग्णावर उपचार करीत आहेत. वार्ड परिसेविका श्रीमती अल्का वाघ, ममता शहा, परिचारिका दिपाली चोपडे, राधिका तायडे, लक्ष्मीबाई लाघे, प्रणाली सोमकोहर, अभिषेक बांगर तसेच कक्षसेवक रोहन वाकडे, सिंधूबाई काळबांडे, सफाई कामगार श्याम निनोरे हे रुग्णाची परिचर्या, देखभाल व काळजी घेत आहेत. सदर अनोळखी रुग्णाचे नातेवाईक पुढे आल्यावर रुग्णाचे डिस्चार्ज दरम्यानचे मेडिकल सोशल वर्कची कामे, पुनर्वसन, मदत व समन्वय करण्याचे कामकाज समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे हे करतील.
0 टिप्पणियाँ