Ticker

6/recent/ticker-posts

ABC होम लीग 2026 (सिजन 5) संपन्न

ABC होम लीग 2026 (सिजन 5) संपन्न

अकोला:-दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा होम लीग चे आयोजन करण्यात आले.हि स्पर्धा दरवर्षी समर कॅम्प नंतर वसंत देसाई स्टेडियम वर घेण्यात येत असते तसेच यावर्षी सुद्धा स्पर्धा संपन्न झाली. आपल्या जिल्ह्या मध्ये बास्केटबॉल खेळला वाव मिळावा व सर्व विद्यार्थ्यांना हा खेळ कसा खेडल्या जातो ,त्याचे नियम कसे असतात, हे समजण्या करिता आपण ही स्पर्धा आयोजित करत असतो.
यावर्षी काही बास्केटबॉल तसेच इतर खेळ प्रेमींनी  स्वतः पुढाकार घेऊन लहान मुलांना टी-शर्ट (किट) देण्याकरिता इच्छुक होते. तसेच अकोला जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन देता त्यांचे व्यवसाय चे नाव त्यांच्या टीमस् ला देण्याचे ठरविले.
स्पर्धेत 6 टीम चे सहभाग होते, प्रत्येक टीम मध्ये 8 खेळाडू,एक टीम ओनर व कोच असे होते.
1.प्रोटीन ओ हाऊस संघाचे ओनर श्लोक तालेपा व कोच पद्मान भोजने, 2.दुर्गा ज्वेलर्स चे ओनर सुनील वर्मा व कोच प्रफुल बोबडे, 3.स्वामी हॉस्टेल चे ओनर दिग्विजय जोशी व कोच करण यादव, 4.विवेक डिझल व टर्बो चे ओनर विवेक पवार व कोच निखिल डोंगरे, 5.सम्यक ट्रेडर्स चे ओनर दिपराज मेश्राम व कोच निर्भय ओल्वे, 6.टीम वन वॉरियर्स चे ओनर अभिजीत शिरसाट व कोच शेख नौशाद हे होते.
सदर स्पर्धा वसंत देसाई स्टेडियम, बास्केटबॉल कोर्ट वर 1 जून 2026 पासून सुरू करण्यात आली होती तसेच त्याचे समारोप 6 जून 2026 शनिवार रोजी शिवराज्याभिषेक दिनी करण्यात आले. कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मा. अनुप भाऊ धोत्रे, आमदार मा. रणधीर भाऊ सावरकर, सर्वांचे लाडके नेते, नगरसेवक व अकोला महानगर पालिकेचे गट नेते मा. पवन भाऊ महल्ले व हर्षद भांभेरे, दिग्विजय सुनिल जोशी
उपाध्यक्ष, मलकापूर खडकी मंडळ भाजप अकोला,
राष्ट्रीय खेळाडू - धीरज वानखडे, सुशांत चरहाटे , जिल्हा क्रीडा संकुल चे इंचार्ज निशांत वानखडे अकोला जिल्हा बास्केटबॉल  संघटनेचे अध्यक्ष - ऍड. राकेश पाली व  सचिव -रवींद्र काकडे हे होते. तसेच विजयी संघ - विवेक डिझल व टर्बो, व त्यांचे कोच निखिल डोंगरे, तसेच उपविजयी संघ - स्वामी हॉस्टेल, व त्यांचे कोच करण यादव व तसेच बेस्ट प्लेअर- संग्राम डाबेकर, रायझिंग स्टार - आदर्श खोब्रागडे, सक्षम गजभिये, विराट खोब्रागडे, नैतिक गणवीर
या सर्वांना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आले. 
तसेच स्पर्धेचे पंच म्हणून केतन गजभिये, भूषण सराग, प्रथमेश घरडे, भूषण मदनकार, शेख फरहान, अनुजा कुंबलवार, नीलम वानखडे, कृष्ण चौधरी, दीप गवई, प्रवीण सुरोशे हे होते.
सर्व प्रमुख पाहुण्यांनी खेळाडूंना आहार व पोषण, मोबाईल पाहणे कमी करून खेळाचे महत्त्व व इतर प्रोत्साहन देण्याचे कार्य आपल्या भाषणा द्वारे केले.त्यामुळे सर्व खेळाडूंमध्ये उत्साह वाढला.तसेच अकोला जिल्हा बास्केटबॉल संघटना व अकोला बास्केटबॉल क्लब ,तसेच खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 
व कार्यक्रमाचे समारोप संपन्न झाले.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ